Corona News:गंभीर व ऑक्सिजनवरील रुग्ण संख्याही १०० च्या आत; सलग पाचव्या दिवशी एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:50 PM2021-11-02T18:50:25+5:302021-11-02T19:00:11+5:30
मंगळवारी दिवसभरात ४ हजार ३०२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. सलग पाचव्या दिवशीही ( मंगळवार दि.२) कोरोनाबधितांचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे मंगळवारी प्रथमच गंभीर व ऑक्सिजनवरील कोरोनाबधितांची संख्या शंभरीच्या आत आली आहे.
मंगळवारी दिवसभरात ४ हजार ३०२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये ६७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ही टक्केवारी १.५५ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात ९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ६६० आहे. तर आज पुण्याबाहेरील ५ जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९३ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ९१ आहे. शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ६० हजार ३२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ३९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ६६३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.