बर्ड फ्लूमुळे मृत कोंबड्यांची संख्या मोजकीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:43+5:302021-01-16T04:14:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंबड्यांच्या आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांनुसार राज्यात पाच जिल्हे वगळता अन्य कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग ...

The number of dead chickens due to bird flu is small | बर्ड फ्लूमुळे मृत कोंबड्यांची संख्या मोजकीच

बर्ड फ्लूमुळे मृत कोंबड्यांची संख्या मोजकीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोंबड्यांच्या आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांनुसार राज्यात पाच जिल्हे वगळता अन्य कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला नाही. ज्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला त्यांची संख्याही मोजकीच आहे, मात्र नियमानुसार काळजी म्हणून त्याच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत असल्याने ती संख्या जास्त वाटते आहे, असे स्पष्टीकरण पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.

राज्यात साडेतीन हजार कोंबड्यांना बर्ड फ्लू अशा आशयाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांच्याबरोबर संपर्क साधला असता ते म्हणाले, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यांमधील मृत कोबड्यांचे काही नमुने तपासल्यानंतर त्यांच्यात लागण झाली असल्याचे आढळले. अशा कोंबड्या आढळलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटरच्या परिघातील सर्व कोंबड्या नष्ट केले जातात. याचा अर्थ नष्ट झालेल्या सर्वच कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला होता असा लावता येणार नाही.

लातूरमधील त्या ठिकाणच्या पोल्ट्रीमधील ३ हजार ४४३, परभणीमध्ये १० हजार व बीडमध्ये ५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्या कोंबड्यांना व त्यांच्यापासून अन्य कोंबड्यांना संसर्ग होऊ नये यासाठी सर्व कोंबड्या नष्ट करण्याचा नियम आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधूनही पशूसंवर्धनकडे नमुने आले आहेत. पाच ठिकाणचे नमुने तपासून निष्कर्ष निघाले त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. आता अन्य ठिकाणचे नमुने तपासले जात आहेत, मात्र त्याचे निष्कर्ष अद्याप आलेले नाहीत, सध्या तरी राज्यात फार मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणता येणार नाही, असे डॉ. परकाळे यांनी सांगितले.

Web Title: The number of dead chickens due to bird flu is small

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.