पुण्यातल्या हॉटस्पॉट गावांचा आकडा १०० च्या घरात; दोन आठवड्यात वाढली संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:19 PM2021-03-23T22:19:55+5:302021-03-23T22:20:20+5:30
१० नगर पालिका रेडझोनमध्ये, जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोनची संख्याही वाढतीच
पुणे: जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाबधितांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे हॉटस्पॉट गावांसोबत कंटेंटमेंटझोनची संख्या वाढली आहे. १५ दिवसांपुर्वी केवळ 50 गावे हॉटस्पॉट होती. ती वाढून आता १०० च्या घरात पोहचली आहे. हा वाढता आकडा चिंताजनक असल्याने नागरिकांनी मी जबाबदार ही मोहीम खऱ्या अर्थाने राबवण्याची गरज आहे.
जिल्ह्यात नव्या वर्षाच्या सुरवातीला कोरोना प्रसाराचा वेग आटोक्यात आला होता. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा वेग जास्त झाला. गेल्या आठवड्यापासून तर गेल्या वर्षीप्रमाणेच ५ हजारांच्या पुढे बाधित रुग सापडू लागले. जिल्ह्यातील अनेक कोरोनामुक्त गवे तसेच ज्या गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले त्या गावातही कोरोना रुग सापडायला लागले. यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुन्हा कंटेंटमेंट झोन आणि हॉटस्पॉट गावांची यादी बनवायला सुरवात केली. जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी केवळ १०पेक्षा जास्त बाधित रुग असलेली 50 हॉटस्पॉट गावे होती. मात्र, ती वाढून आता १०० राच्या घरात गेली आहे. १४ नगर परिषदांपैकी १० नागरपरिषदा या रेडझोन मध्ये आहेत. सर्वाधिक रुग हे बारामती नगरपालिकेत आहेत. बाराममतीत एकूण रुग्ण हे 4 हजार 431 आहेत. तर सक्रिय रुग्ण हे ३४३ आहेत. त्या खालोखाल तळेगाव नगरपालिका आणि सासवड नगर पालिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. तर खेड, हवेली, जुन्नर, दौंड तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांची संख्या आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. यामुळे प्रशासनाला कठोर उपाय योजना करावा लागणार आहे.
जिल्ह्याचा मृत्युदर 2.15 तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.31 टक्के
जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. रुग्ण वाढीचा आकडा चिंताजनक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. 92.31 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. तर 2.15 टक्के मृत्युदर आहे. प्रश्नासातर्फे जरी कडक निर्बंध असले तरी ते पाळण्याची जबाबदारी ही नागरिकांवर आहे.
जिल्ह्यात 1 हजार 535 कंटेंटमेंट झोन
वाढत्या रुग्णामुळे कंटेंटमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात 1 हजार 195, तर 14 नगरपरिषदेच्या परिसरात 325, आणि तीन कटक मंडळात 15 असे 1 हजार 535 कंटेंटमेंट झोन प्रशासनाने तयार करण्यात आले आहे.
राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण
संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. राज्यात सोमवारी (दि 22) 5 हजार 121 सत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सोमवारी 2 लाख 76 हजार 354 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्या पैकी 1 लोक 90 घर 420 नागरिकांना कोविशीलड लस तर 95 हजार 923 नागरिकांना कोव्हेक्सींन लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात
वाढत्या कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरणाच्या वेग वाढवण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा आमचा पर्यंत आहे. त्यानुसार लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी