ओतूर परिसरात कोविड मृत्यूंची संख्या १००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:05+5:302021-06-30T04:08:05+5:30
मंगळवारी ओतूर नेतवडमाळवाडी, हिवरे खुर्द येथे प्रत्येक गावात एक एक रुग्ण डुंबरवाडी, खामुंडी या प्रत्येक गावात दोन दोन असे ...
मंगळवारी ओतूर नेतवडमाळवाडी, हिवरे खुर्द येथे प्रत्येक गावात एक एक रुग्ण डुंबरवाडी, खामुंडी या प्रत्येक गावात दोन दोन असे ७ नवीन रुग्ण सापडले आहेत .
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १हजार १३२ झाली आहे. या पैकी १ हजार ५६ बरे झाले आहेत. २३ कोविड सेंटर १७ जण घरीच उपचार घेत आहेत. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथील १०६ पैकी ९५ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवड येथील बाधितांची संख्या ८८ झाली असून ८२ बरे झाले आहेत. ६जणांचा मृत्यू झाला आहे. डुंबरवाडी येथील ७३ पैकी ६७ बरे झाले आहेत. ६ जण उपचार घेत आहेत. हिवरे खुर्द येथील ७३ पैकी ६६ बरे झाले आहेत. २ जण घरीच उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली.