पुण्यातल्या मायक्रो कंटेंमेन्ट झोनची संख्या पोचली २०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:38+5:302021-03-28T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेने रुग्णवाढ होणाऱ्या भागात ‘मायक्रो कंटेंमेन्ट झोन’ घोषित केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेने रुग्णवाढ होणाऱ्या भागात ‘मायक्रो कंटेंमेन्ट झोन’ घोषित केले असून मागील महिन्याभरात शहरातील हे कंटेंमेन्ट झोन दोनशेच्या पार गेला आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ७८ इमारती आणि ९५ सोसायट्यांचा समावेश आहे.
शहरात फेब्रुवारीनंतर कोरोना रुग्ण वाढत गेले आहेत. नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे. शासनानेही शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
पालिकेने ज्या भागात करोना रूग्ण वाढत आहेत असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याभरात हे क्षेत्र वाढत गेले असून सर्वाधिक क्षेत्र नगर रस्ता आणि धनकवडी परिसरात असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या साथीमध्ये सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कमी कंटेंमेन्ट झोन आणि रुग्ण आहेत. तर, सर्वात कमी झोन हे कसबा विश्रामबाग आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
चौकट
सोसायट्यांमधील निर्बंध नावालाच
ज्या सोसायट्या अगर इमारतींमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत त्या इमारतींना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जात आहे. बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई आहे. परंतु, नागरिक बिनदिक्कत ये-जा करीत असतात. यासोबतच रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असतानाही त्याचे पालन केले जात नाही.
चौकट
क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी
नगर रस्ता - ३९
धनकवडी-सहकारनगर - २७
औंध-बाणेर - २३
सिंहगड रस्ता - १८
शिवाजीनगर - १६
कोंढवा - १५
बिबवेवाडी - ११
कोथरूड - १०
भवानी पेठ - ९
वानवडी - ९
वारजे - ८
हडपसर - ७
ढोले पाटील रस्ता - ६
कसबा विश्रामबाग - ४
येरवडा -कळस-धानोरी -४