नवीन कोरिनाबधितांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:13+5:302020-12-07T04:09:13+5:30
( सर्व आकडेवारी १ डिसेंबर,२०२० पर्यंतच्या नोंदणीनुसार) पुणे : नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण घटले गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच १ आॅगस्ट पासून राज्यात ...
( सर्व आकडेवारी १ डिसेंबर,२०२० पर्यंतच्या नोंदणीनुसार)
पुणे :
नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण घटले
गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच १ आॅगस्ट पासून राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक जाणवला गेला़ याचा सर्वाधिक उच्चांक हा १७ सप्टेंबर रोजी झाला व राज्यात एकाच दिवशी तब्बल २४ हजार ६१९ नवे रूग्ण आढळून आले़ गणेशोत्सवानंतर आलेली संसर्गाची या लाटेची पुनर्रावृत्ती दिवाळीनंतर होईले असे वाटले होते़ परंतु, राज्यात दिवाळीनंतरचे चार पाच दिवस वगळता नवे कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण घटले असून, सरासरी साडेचार हजाराच्या आसपासच रूग्ण दररोज आढळून येत आहेत़
राज्यातील दैनदिंन कोरोनावाढीचा दर ०.२१ टक्के
कोरोनाची दैनंदिन वाढ होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या देशातील पहिल्या पंधरा राज्यांमध्ये, सर्वाधिक वाढ ही हिमालचल प्रदेशमध्ये होत असून, येथील वाढीचा दैनंदिन दर हा १.२९ टक्के आहे़ त्या पाठपोठ पहिल्या पंधरा राज्यात राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मेघालय, केरळा, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, झिोरॉम, मणिपूर, चंदीगड, उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे़ उत्तरप्रदेशाचा कोरोनावाढीचा दर हा ०.३३ टक्के आहे़ तर महाराष्ट्राचा त्याहून खूपच कमी म्हणजे केवळ ०.२१ टक्के आहे़
-------------------------------
अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी होतेय
राज्यात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल अशी शंका होती़ मात्र चित्र उलटे दिसून येत असून, २५ आॅक्टोबर पासून राज्यातील कोरोनाबाधितांची वाढ दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे़ २५ आॅक्टोबर रोजी १ लाख ४० हजार ४८६ अॅक्टिव्ह रूग्ण राज्यात होते़ तेच १ डिसेंबर रोजी ८९ हजार ९८ वर आले आहेत़
------
मृत्यूदर मात्र राज्यात अधिक
एकीकडे कोरोनावाढीच्या म्हणजे कोरोना संसर्गाचे प्रमाण राज्यात कमी असतानाच, मृत्यदरात मात्र महाराष्ट्र देशात पंजाब पाठोपाठ आहे़ पंजाबचा मृत्यूदर हा ३.१६ असून, महाराष्ट्राचा दर हा २.५९ टक्के इतका आहे़ तर देशाचा मृत्यूदर हा १.४५ टक्के असून, देशात सर्वाधिक कमी मृत्यूदर हा त्रिपूरा राज्याचा असून तो १.१३ टक्के आहे़
---------------------------