दिलासादायक! पुण्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ५०च्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:51 PM2021-11-08T20:51:05+5:302021-11-08T20:53:36+5:30
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १०४ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ७५ आहे
पुणे: शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत असून, सोमवारी (दि. ८) केवळ ४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ६९५ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १.२७ टक्के इतकी आहे. दरम्यान, आजही शहरातील एकाही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही. मात्र, पुण्याबाहेरील दोन कोरोनाबधित दगावले आहेत. आज दिवसभरात ५७ जण कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ६४७ इतकी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १०४ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ७५ आहे. शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ८५ हजार ७४५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ८०६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ९५ हजार ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ९ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.