येरवड्यात रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:37+5:302021-06-04T04:08:37+5:30
इतर खासगी रुग्णालयांसह गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती ठीक आहे. दैनंदिन तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, सत्तर नमुन्यांची ...
इतर खासगी रुग्णालयांसह गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती ठीक आहे. दैनंदिन तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, सत्तर नमुन्यांची तपासणी केल्यावर पाच किंवा त्याहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. एकंदरीतच येरवडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी होत असून, उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती देखील उत्तम आहे.
येरवडा येथे सुरू करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर वसतिगृह कोविड सेंटर या ठिकाणी बालकांसाठी विशेष कक्षदेखील उभारण्यात आलेला आहे. नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत असून, येरवड्यात राजीव गांधी रुग्णालयासह एकूण सहा ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.
परिमंडळ एक विभागात एकूण ८७९ रुग्ण -
येरवड्यातील ३३७ रुग्णांसह ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत शंभर तर, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात सव्वाचारशे रुग्ण आहेत. तीनही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सत्तर टक्क्यांहून जास्त खाटा रुग्णांसाठी सध्या उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत ३० टक्के अत्यवस्थ व गंभीर स्वरूपातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ससून, पुणे स्टेशन रेल्वे हॉस्पिटलसह परिमंडळ १ विभागातील तेरा केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध असून, नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणाचा फायदा घेत असल्याची माहिती महापालिका सहआयुक्त संजय गावडे यांनी दिली.