ओतूर परिसरातील ४ गावांत १५ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:34+5:302021-07-18T04:09:34+5:30
ओतूर परिसरातील १९ गावांपैकी शनिवारी ४ गावांत तब्बल १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरातील या गावांची चिंता वाढली आहे. ...
ओतूर परिसरातील १९ गावांपैकी शनिवारी ४ गावांत तब्बल १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरातील या गावांची चिंता वाढली आहे. शनिवारी डिंगोरे ६, ओतूर शहर ३, डुंबरवाडी ५, हिवरे खुर्द १ असे १५ रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ७२७ झाली आहे.
शनिवारी डिंगोरे शहरात ६ रुग्ण सापडल्याने येथील बाधितांची संख्या २८२ झाली आहे. पैकी २५६ बरे झाले आहेत. १४ जण उपचार घेत आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील नवीन ३ रुग्णामुळे येथील बाधितांची संख्या १ हजार १८८ झाली आहे. पैकी १ हजार १२४ बरे झाले आहेत. १८ जण कोविड सेंटर ५ जण घरीच उपचार घेत आहेत. ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. डुंबरवाडी येथील नवीन रुग्णामुळे बाधितांची संख्या ७९ झाली आहे ७३ बरे झाले आहेत. ६ जणांवर उपचार सुरु आहेत.
हिवरे खुर्द येथील ८५ पैकी ७६ बरे झाले आहेत. ४ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. श्रीहरी सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली.