तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर येईल : आढळराव-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:14+5:302021-09-02T04:22:14+5:30

मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या वेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, महालसीकरण मोहिमेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. ...

The number of patients in the taluka will come to zero: Adhalrao-Patil | तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर येईल : आढळराव-पाटील

तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर येईल : आढळराव-पाटील

Next

मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या वेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, महालसीकरण मोहिमेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनाने व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम दिसून येत आहे.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, लसीकरणाच्या माध्यमातून आंबेगाव तालुका देशामध्ये एक वेगळे उदाहरण देणार आहे. कोरोना लसीकरण पूर्ण करून आंबेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल. मंचर येथे आठ दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ५० हजार लस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज हे लसीकरण पार पडत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना लस कमी पडतील असे सांगितल्यानंतर, त्यांनी अतिरिक्त लस उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. डी. के. वळसे-पाटील यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच किरण राजगुरू, प्रांत सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, सुहास बाणखेले उपस्थित होते.

३१ मंचर

मंचर उपजिल्हा रुग्णालयात बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील समवेत देवेंद्र शहा.

Web Title: The number of patients in the taluka will come to zero: Adhalrao-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.