लक्षणे कमी असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने चाचण्याही घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:14+5:302021-05-13T04:12:14+5:30

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चाहूल लागली आहे. गेल्या बारा दिवसांत कोरोनाबाधितांची ...

As the number of people with less symptoms decreased, so did the number of trials | लक्षणे कमी असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने चाचण्याही घटल्या

लक्षणे कमी असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने चाचण्याही घटल्या

Next

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चाहूल लागली आहे. गेल्या बारा दिवसांत कोरोनाबाधितांची दैनंदिन टक्केवारीही कमी झाली आहे. एप्रिलपर्यंत २० हजारांच्या पुढे असलेल्या कोरोना संशयितांच्या चाचण्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या बारा दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या तब्बल १५ हजार ८९३ ने खाली आली आहे.

कोरोनाची चाचणी कमी होण्यास कोरोना चाचणी किटची कमतरता हे नसून, लक्षणे कमी असणाऱ्यांची संख्याच दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागरिकांना चाचणी करून घेण्याची आवश्यकता पडत नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान महापालिकेच्या १८ तपासणी केंद्रांव्दारे घेण्यात येणाऱ्या स्वॅबची संख्याही कायम आहे. आजही याठिकाणी दररोज ३ हजार स्वॅब घेण्यात येत आहेत. मात्र, स्वॅब घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीत लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे शहरातील २७ खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले असून, ९ मेपासून कोरोना चाचण्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एप्रिलपर्यंत २० हजारांपर्यंत दररोज होणाऱ्या चाचण्या गेल्या तीन दिवसांपासून सात ते आठ हजारांने घटल्या आहेत़

---

दिनांक चाचण्याबाधित संख्या टक्केवारीसक्रिय रुग्णसंख्या

१ मे १९,३३५४,०६९ २१़०४ ४२,९०७

२ मे १६,६१०४,०४४ २४़३४ ४२,२२९

३ मे १२,२७६२,५७९ २१़०० ४०,७०१

४ मे १५,०९८२,८७९ १९़०६ ३९,८३९

५ मे १९,७९०३,२६० १६़४७ ३९,७३२

६ मे १८,८६२२,९०२ १५़३८ ३९,५८२

७ मे १६,७६३२,४५१ १४़६२ ३८,४८१

८ मे १७,११८२,८३७ १६़५७ ३६,५८६

९ मे १३,१०७२,०२५ १५़४४ ३३, ७३२

१० मे ११,४९९१,१६५ १०़१३ ३०, ८३६

११ मे ११,९९६२,४०४ २०़०४ २९, ७०२

१२ मे १३,९८११,९३१ १३़८१ २७,०१४

---

दोन-तीनदा तपासणी करणारे पाच ते दहा टक्के

आपण कोरोनामुक्त झालो आहे का याची खात्री करण्यासाठी, पहिल्यांदा पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा १७ दिवसांनंतर पुन्हा स्वत:ची तपासणी करून घेत आहे. त्यामुळे दैनंदिन चाचणी करणाऱ्या संशयितांमध्ये साधारणत: पाच ते दहा टक्के चाचणी करणारे हे दोनदा-तीनदा येणाऱ्या व्यक्ती आहेत. महापालिकेच्या तपासणी केंद्रांवर हे प्रमाण ५ टक्क्यांच्या आत असले तरी, खासगी प्रयोगशाळांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत आहे. महापालिकेकडून केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्येही ही बाब वारंवार दिसून आली आहे.

--

कोट

आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा उपचाराअंती १७ दिवसांनंतर कोरोनामुक्त होतो. त्यामुळे त्याने पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, तरीही अनेक जण स्वत:च्या व कुटुंबाच्या समाधानासाठी वारंवार स्वत:ची कोरोना चाचणी करून घेत आहेत. दरम्यान काही खासगी आस्थापना या कोरोनाबाधित कर्मचारी कोरोनामुक्त झाला असल्याची खात्री करण्यासाठी, त्यास पुन्हा कोरोना चाचणी करण्यास सांगत आहेत. परंतु, हे अत्यंत चुकीचे असून अशा आस्थापनांची तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली़.

Web Title: As the number of people with less symptoms decreased, so did the number of trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.