जिल्ह्यात रेशन दुकानांची संख्या वाढणार तीनशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:27+5:302021-09-22T04:12:27+5:30
सर्व हॅलो हेड, नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’; जिल्ह्यात वाढीव 300 पेक्षा अधिक दुकाने ! जुन्यांची मक्तेदारी हटणार : ...
सर्व हॅलो हेड,
नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’; जिल्ह्यात वाढीव 300 पेक्षा अधिक दुकाने !
जुन्यांची मक्तेदारी हटणार : शासनाचा निर्णय
स्टार १२०४
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागातील नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीवरील स्थगिती उठविण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात आता जवळपास तीनशेहून अधिक नवीन स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या आदेशाने शहरी भागातील वर्षानुवर्षे जोडलेली, दुकानदारांनी स्वतः मालक समजून कब्जा केलेली दुकाने आपोआप काढली जाणार असून लाभार्थींची गैरसोय देखील दूर होणार आहे.
राज्यभरात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. मात्र, हा आराखडा अंतिम होण्याकरिता काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही स्थगिती उठविण्यास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी आदेश काढण्यात आले.
चौकट
नवीन दुकानांसाठीचा जाहीरनामा
ही स्थगिती उठविण्यात आल्याने आता २०२१-२२ या वर्षाकरिता सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत शहरी भागात नवीन स्वस्त धान्य मंजूर करण्यासाठी जाहीर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याविषयी अवर सचिव गजानन देशमुख यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा विभागाचे संचालक, पुरवठा विभागाचे सर्व उपआयुक्त, सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी यांना पत्र दिले आहे.
------
लोकसंख्येनुसार रेशन दुकाने
शासनाच्या आदेशानुसार आता शहर, जिल्ह्यात नवीन रेशन दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकसंख्येनुसार रेशन दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सध्या सुरू असलेली दुकाने, रद्द केलेली दुकाने, बंद पडलेली दुकाने व लोकसंख्येनुसार सुरू करावी लागणारी रेशन दुकानांची संख्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
- सचिन ढोले, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी.
------
जिल्ह्यात अशी वाढू शकते रेशन दुकानांची संख्या
- ग्रामीण भागात : किमान १००
- नगरपालिका क्षेत्र : १३
- शहरी भागात : १५०-२००