पुण्यामध्ये लॉकडाऊन काळात आत्महत्येचे प्रमाण घटले; गतवर्षीपेक्षा संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:03 PM2020-08-18T13:03:20+5:302020-08-18T13:11:49+5:30

घरगुती वाद, प्रेम प्रकरण आणि मानसिक नैराश्य या तीन प्रमुख कारणांचे प्रमाण ४५ टक्के होते. 

The number of suicides in the pune city decreased during the lockdown | पुण्यामध्ये लॉकडाऊन काळात आत्महत्येचे प्रमाण घटले; गतवर्षीपेक्षा संख्या कमी

पुण्यामध्ये लॉकडाऊन काळात आत्महत्येचे प्रमाण घटले; गतवर्षीपेक्षा संख्या कमी

Next
ठळक मुद्देएसएनडीटी महाविद्यालयाचा अभ्यासया निरीक्षणानुसार २०१९ पेक्षा २०२० मध्ये ४१ने आत्महत्यांची संख्या कमी लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात असल्याने आत्महत्येचे प्रमाण कमी

पुणे : लॉकडाऊनच्या काळात मानसिक, आर्थिक स्वास्थ बिघडल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कुटुंबात लोक एकत्र असल्याने आत्महत्यांचे प्रमाणात घट झाली असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. गतवर्षी २०१९ मध्ये मार्च ते जुलै या काळात पुणे शहरात एकूण ३०५ आत्महत्यांच्या घटना घडल्या होत्या. त्याच काळात या वर्षी २०२० मध्ये त्यात घट होऊन २६४ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. 
पुणे शहर पोलिसांच्या मदतीने एसएनडीटी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माधवी कुलकर्णी आणि सहयोगी प्रा़ वासंती जोशी व मानसी राजहंस यांनी शहरातील मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये झालेल्या आत्महत्यांचा तुलनांत्मक अभ्यास करुन आपले निरीक्षण नोंदविले आहे. 
या निरीक्षणानुसार २०१९ पेक्षा २०२० मध्ये ४१ आत्महत्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचवेळी वय, स्त्री, पुरुष यांच्या प्रमाणात फारसा फरक दिसून आला नाही. मध्यम वर्गीयांच्या आत्महत्येचे प्रमाण दोन्ही वर्षात अधिक होते. २०१९ मध्ये ते ५३ टक्के होते आता ते ५१ टक्के झाले आहे. घरगुती वाद, प्रेम प्रकरण आणि मानसिक नैराश्य या तीन प्रमुख कारणांचे प्रमाण ४५ टक्के होते. ते यंदा ३० टक्के झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात व एकत्र असल्याने एकत्र कुटुंबांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी आढळून आले असून हम दोन हमारे दोन अशा चौकोनी कुटुंबामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. 
़़़़़़़़
अ‍नलॉकमध्ये जनजागृती महत्वाची
याबाबत उपप्राचार्या कुलकर्णी यांनी सांगितले की, कोविड १९ ची भिती इतकी होती की सर्व समस्या त्यापुढे कमी वाढण्याची शक्यता आहे़ मात्र त्याचा परिणाम म्हणून आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले असण्याची शक्यता आहे़.आता अनलॉक सुरु झाला आहे.व्यवसायातील वाढत्या समस्या, कर्जबाजारीपणा, नोकरीची भिती असे प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. आत्महत्या करणे हा एकमेव उपाय नाही, याविषयी जनजागृती करणे, गरजेचे आहे. गरीब वर्गांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी वस्त्यांमध्ये मानसिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. हेल्पलाईनची माहिती लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. 
..........
पुणे शहरातील मार्च ते जुलैमधील आत्महत्या
घटक           २०१९    २०२०
स्त्री         ७६             ६६
पुरुष        २२६             १९८
तृतीयपंथी   १             ०
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एकूण        ३०५             २६४
़़़़़़़़़़़़़़़़़

आत्महत्येचे प्रकार        २०१९             २०२०
गळफास                         २२१             १०३
विष प्राशन                    २०                    ७
पाण्यात बुडून                  ५                    ३
स्वत:ला जखमी करुन     ९                 ५
उडी मारुन                      १४                   ७
पेटवून घेऊन                  २                    १
.................
                                       २७१            १२६
 .............................

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक
 कोथरुड, चतु:श्रृंगी, वारजे माळवाडी, बिबवेवाडी या परिसरात लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होते़ मात्र, गतवर्षीपेक्षा या परिसरात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे़ त्याचवेळी शहराच्या मध्यवस्तीत सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा कहर पहायला मिळाला़ मात्र, या ठिकाणी आत्महत्येचे प्रमाण गतवर्षीच्या मानाने कमी असल्याचे दिसून आले आहे़ 

लॉकडाऊनच्या काळात फरासखाना, विश्रामबाग, खडक, हडपसर, कोंढवा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोनाची लागण झाली होती़ मध्य वस्तीतील अनेक पेठा ३ महिने जवळपास पूर्ण बंद होत्या़ मात्र, या ठिकाणी आत्महत्येचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी आढळून आले आहे़ 
......................................

पोलीस ठाणेनिहाय आत्महत्येच्या घटना
पोलीस ठाणे    २०१९    २०२०
हडपसर          ३६          २४
फरासखाना    ७             २
खडक            ५             १
कोंढवा         १७          १३
खडकी          ६            ५
विश्रामबाग   ५             १
चतृ:श्रृंगी       २३        २४
कोथरुड        ८            १३
सहकारनगर १४          १९
वारजे            ११         २१
बिबवेवाडी      ६             ८
 

Web Title: The number of suicides in the pune city decreased during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.