ब्रिटनहून आलेल्या बाधितांचा आकडा तीनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:21+5:302020-12-26T04:10:21+5:30
ब्रिटनहून दि. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार ...
ब्रिटनहून दि. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार स्थानिक प्रशासनाकडून हा शोध घेतला जात आहे. राज्य शासनाकडून या प्रवाशांची याची प्रशासनाला देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात आलेल्या प्रवाशांचा आकडा ४ हजार ६२९ एवढा आहे. सर्वेक्षणामध्ये ८३१ प्रवाशांना शोधण्यात आले असून त्यापैकी ३२९ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये पुण्यासह मुंबई व नागपुर येथील प्रत्येक एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत. पुढील पाच दिवसांत या नमुन्यांचा अभ्यास करून त्याचे ब्रिटनमधील विषाणुशी साधर्म्य आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
-----------