शिरूर तालुक्यात बाधितांचा आकडा चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:02+5:302021-04-21T04:10:02+5:30
शिरूर तालुक्यात आजपर्यंत १३९२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. ११२२३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २२२ जणांचा मृत्यू झाला. २४८४ विविध ...
शिरूर तालुक्यात आजपर्यंत १३९२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. ११२२३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २२२ जणांचा मृत्यू झाला. २४८४ विविध रुग्णालयांत उपचार घेत आहे. ३७० आज बरे झाले आहेत. शिरूर तालुक्यात सोमवारी (दि. १९) सणसवाडी ७, शिक्रापूर ५२, तळेगाव ढमढेरे ६, कासारी १, निमगाव म्हाळुंगी १, पारोडी १, दरेकरवाडी २, कोंढापुरी १, धानोरे १, बुरुंजवाडी ४, कोरेगाव भिमा १, रांजणगाव गणपती ७, पिंपरी दुमाला १, कुरूळी १, मांडवगण फराटा ११, पिंपळसुटी २, गणेगाव दुमाला २, इनामगाव ६, वडगाव रासाई ३१, शिरसगाव काटा ५, न्हावरे ४, कोळगाव डोळस २, उरळगाव १, नागरगाव १५, आलेगाव पागा १, रांजणगाव सांडस ४, शिंदोडी ३, निर्वी १, आंबळे ५, निमोने १, जांबुत १, टाकळीहाजी १, कारेगाव १, शिरूर ग्रामीण ५, सरदवाडी १, मलठण १, मोराची चिंचोली २, कांहुर मेसाई १, केंदुर १०, करंदी २, पिंपळे धुमाळ १, पाबळ ६, पिंपळे जगताप १, धामारी ४, हिवरे १, मुखई १, वढू बुद्रुक १, शिरूर शहर ७ असे शिरूर तालुक्यांतील ४८ गावांत २२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. २ जणांचा मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावून गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.
शिक्रापूर परिसरात आढळले ८२ कोरोनाबाधित
शिक्रापूर परिसरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सोमवारी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावांमध्ये शिक्रापूर येथे ४४, सणसवाडी येथे ११, तळेगाव ढमढेरे येथे १५, कोरेगाव भीमा येथे २, बुरुंजवाडी येथे ९, कोंढापुरी येथे १ असे नव्याने ८२ कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवसात आढळून आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.