पुणे विभागातील टँकरची संख्या चारशेवर : दुष्काळाची तीव्रता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:29 PM2019-03-18T13:29:32+5:302019-03-18T13:35:46+5:30

पुणे विभागातील ८ लाख १५ हजार नागरिक आणि  ४४ हजार ९९८ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे.

The number of water tankers in the Pune division has increased on four hundred | पुणे विभागातील टँकरची संख्या चारशेवर : दुष्काळाची तीव्रता वाढली

पुणे विभागातील टँकरची संख्या चारशेवर : दुष्काळाची तीव्रता वाढली

Next
ठळक मुद्देविभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३६२ वर सातारा , सांगली व सोलापूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा

पुणे : पुणे विभागातील ८ लाख १५ हजार नागरिक आणि  ४४ हजार ९९८ पशुधन दुष्काळाने बाधित प्रभावित झाले आहे. सातारा ,सांगली व सोलापूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११७ टँकर सुरू आहेत. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पुणे विभागातील दुष्काळ बाधितांना ४०६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 
विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३६२ वर गेली आहे. वाड्यांची संख्या २ हजार ६०० झाली आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ८० आहे. तर साताºयात १०१ टँकर सुरू आहेत. यंदा दुष्काळाची तीव्रता भीषण असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील टँकरची संख्या चांगलीच वाढणार आहे. सध्या सोलापुरातील एकट्या मंगळवेढा तालुक्यात ४१ आणि सांगोला तालुक्यात २० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर विभागात सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यात सर्वाधिक ६८ टँकरने सुरू आहेत. जतमधील १ लाख ६३ हजार ७२९ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात ८० टँकर सुरू असून बारामतीत २२ तर शिरूरमध्ये १७ टँकर सुरू आहेत. तर सांगलीत १०८ टँकरने पाणी पुरवठा सुरू असून माण तालुक्यत ६४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४५ हजार ८२१ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. सोलापूर पाठोपाठ सांगलीमधील २ लाख ४३ हजार ३४४  नागरिक प्रभावित झाले आहेत. तर साताऱ्यातील बाधितांची संख्या १ लाख ७२ हजार ३३७ झाली असून पुणे जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ३१५ नागरिक दुष्काळाने बाधित आहेत. 
-
 जिल्हा व तालुका निहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे:   
 पुणे : आंबेगाव १२, बारामती २२, दौंड ९, हवेली २, इंदापूर २,जुन्नर ३, खेड ४, पुरंदर ९, शिरूर १७.  
सातारा : माण ६४, खटाव १४, कोरेगाव १७, फलटण ३, खंडळा १, वाई १.   
सांगली : जत ६८, कवठेमहांकाळ ८, तासगाव ३, खानापूर ८, आटपाडी २१.  
 सोलापूर : सांगोला २१, मंगळवेढा ४१, माढा ७, करमाळा १७, माळशिरस ७, मोहोळ ४, दक्षिण सोलापूर १०, उत्तर सोलापूर ४, अक्कलकोट ३, बार्शी ३.

Web Title: The number of water tankers in the Pune division has increased on four hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.