कोणत्याही भाषेत नंबरप्लेट; दीड हजाराचा लागेल दंड !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:22 PM2022-09-24T16:22:26+5:302022-09-24T16:24:01+5:30

...तर आधी ५०० व नंतर दीड हजाराचा दंड..

Numberplate in any language A fine of one and a half thousand will be required! | कोणत्याही भाषेत नंबरप्लेट; दीड हजाराचा लागेल दंड !

कोणत्याही भाषेत नंबरप्लेट; दीड हजाराचा लागेल दंड !

Next

पुणे : दुचाकी असो अथवा चारचाकी वाहनाला नंबरप्लेट असणे आणि तीही नियमात असणे गरजेचे आहे. काही लोक विशेषत: युवा वर्गात फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ असते. नियमबाह्य नंबरप्लेट लावून ते शहरभर थाटात फिरत असतात; पण पोलिसांचे याकडे लक्ष असते आणि त्यावर पोलीस दंडात्मक कारवाई देखील करू शकतात याचे भान या युवकांना नसते. यासह काही दोन नंबरचा व्यवसाय करणारी मंडळी देखील बनावट नंबरचा वापर करत असतात. तसेच इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांतील नंबरप्लेट वाहनाला लावणे हे देखील चुकीचे आहे. पोलीस अशा विविध भाषेच्या नंबरप्लेटवर देखील दीड हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करू शकतात.

केवळ इंग्रजीतच हवी अक्षरे..

दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नंबरप्लेट इंग्रजीमध्येच असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जड वाहने व ज्या वाहनांना राष्ट्रीय परवाना आहे त्यांना देखील इंग्रजी नंबर प्लेट असणे बंधनकारक असते; मात्र दोन्ही बाजूच्या नंबरप्लेट स्थानिक भाषेत असल्या तरी चालतात, अशी माहिती पुणे वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

...तर आधी ५०० व नंतर दीड हजाराचा दंड

नियमबाह्य नंबरप्लेट असल्यावर पोलिसांनी पकडले तर पहिल्यांदा ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. दुसऱ्यांदा मात्र तेच वाहन पोलिसांनी पकडले तर दीड हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

७ हजार ७५० वाहनांवर कारवाई

१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुणे पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट अथवा नियमबाह्य नंबरप्लेट असणाऱ्या ७७५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करत, वाहन चालकाकडून ४३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नंबर प्लेट कशी हवी ?

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९मध्ये २००५ साली बदल करण्यात आला. त्यानुसार वाहनाच्या नंबर प्लेटवर IND असे लिहीत, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट असावी असा निर्णय घेण्यात आला. ही नंबरप्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते. आता नवीन नियमानुसार शोरूम मधून वाहन बाहेर पडतानाच त्याला नंबर प्लेट लावून दिली जावी असा नियम आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट ॲल्युमिनियम पासून बनवलेल्या असून या प्लेट्समध्ये २० बाय २० क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे.

Web Title: Numberplate in any language A fine of one and a half thousand will be required!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.