कोरोनाकाळात सलग दहा महिने काम करणाऱ्या परिचारीकेचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:07+5:302020-12-07T04:08:07+5:30
मूळच्या टाकळी हाजी येथील असणाऱ्या सविता बोखारे या वीस वर्षापासून पुणे महापालिकेत आरोग्य परिचारिका या पदावर कार्यरत आहे. सध्या ...
मूळच्या टाकळी हाजी येथील असणाऱ्या सविता बोखारे या वीस वर्षापासून पुणे महापालिकेत आरोग्य परिचारिका या पदावर कार्यरत आहे. सध्या त्या बोपोडी येथील द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर या दवाखान्यामध्ये धोरणाच्या अतिदक्षता विभागांमध्ये काम करीत आहे. त्यांनी सुट्टी न घेता सलग दहा महिने सेवा केल्याबद्दल टाकळीहाजी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते ,सहाय्यक शिक्षण प्रमुख शिवाजी बोखारे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, निमगाव दुडे चे माजी सरपंच दीपक दुडे पाटील, प्रभाकर खोमणे सर ,चंद्रकांत साबळे चांदा भाऊ गावडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. .
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की कोराेनाच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून बोखारे यांनी उत्तम प्रकारची आरोग्यसेवा केली असून त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे.
सत्काराला उत्तर देताना सविता बोकारे म्हणाल्या, संकट काळात आरोग्य सेवा केल्याबद्दल माझ्या गावाने माझा सत्कार केला. त्यामधून मला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
फोटो
०६ टाकळी हाजी
सविता बोखारे यांचा सन्मान करताना राजेंद्र गावडे.