वाढती थंडी गव्हासाठी पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:28+5:302020-12-23T04:08:28+5:30
आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. तसे पाहिले तर पूर्वीपेक्षा गहू व हरभऱ्याचे लागवडीखालील क्षेत्र ...
आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. तसे पाहिले तर पूर्वीपेक्षा गहू व हरभऱ्याचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. याची अनेक कारणे आहेत. तालुक्यातील बहुतेक शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. नगदी पिकातून चांगला फायदा मिळत असल्याने गहू, हरभरा पिकाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे.
कोबी, फ्लॉवर, बीट, कांदा, ऊस ही नगदी पिके तालुक्यातील शेतकरी आता घेऊ लागला आहे. चार महिन्यांनी गव्हाचे उत्पादन निघते. त्यामुळे शेतकरी लवकर उत्पादन निघणाऱ्या पिकांना प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागात रेशनिंग दुकानातून बऱ्यापैकी गहू मिळत असल्याने शेतातील गव्हाऐवजी रेशनिंगच्या गव्हाचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. मागील चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ही थंडी रब्बी पिकांसाठी विशेषता गहू,हरभरा,ज्वारी या पिकांना फायदेशीर ठरणार असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली. थंडीमुळे या पिकांची वाढ जोमदार होणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार आहे.
चौकट
वाढत्या थंडीमुळे धुके येऊ शकते. त्याचा फटका कांदा, बटाटा या पिकांना बसणार आहे. या पिकावर भुरी, मावा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वेलवर्गीय पिकांवर रोगराई वाढू शकते. काही शेतकऱ्यांनी घरी खाण्यापुरता गहू शेतात पेरला आहे. थंडीमुळे हे गव्हाचे पिक तरारले आहे.
फोटोखाली: ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला असून त्याचा फायदा गव्हाच्या पिकाला होणार आहे.