पोषण आहारातील तांदळाचा अपहार

By admin | Published: October 11, 2016 02:14 AM2016-10-11T02:14:12+5:302016-10-11T02:14:12+5:30

पुणे महापालिकेचा शालेय पोषण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी वितरीत करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या विक्रीप्रकरणी खडक

Nutrition Disease Risk Disorder | पोषण आहारातील तांदळाचा अपहार

पोषण आहारातील तांदळाचा अपहार

Next

पुणे : पुणे महापालिकेचा शालेय पोषण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी वितरीत करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या विक्रीप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मंगलाराम नारायणराम सिरवी (वय ३०, रा. नंदनवन सोसायटी, हांडेवाडी चौक, हडपसर. मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल समेलारामजी देवासी (वय ३४, रा. अण्णा कवडे चाळ, घोरपडी गाव, मूळ रा. राजस्थान) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शालेय पोषण आहारचे अधीक्षक मदन भागवत हगवणे
(वय ४३, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील अरुणा पुरुषोत्तम सापा, हाजरा रफिक अन्सारी, वर्षा भारत सोनवणे, शमिम इस्माईल मुंगळे (चौघही रा. भवानीपेठ) आणि रामलाल चौधरी (रा़ कोंढवा) यांचा पोलीस शोध घेत आहेत. शालेय पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांसाठी आहार बनविण्यासाठी तांदळाचा पुरवठा केला जातो़ पुरवठा केलेल्या या तांदळापैकी १ हजार १५५ किलो वजनाच्या २४ बॅगा घेऊन टेम्पो मार्केटमध्ये बेकायदेशीररीत्या विकण्यासाठी २४ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता चालला होता़ हा टेम्पो पकडण्यात आला़ टेम्पोचालक वैभव जाधव याला याबाबत विचारणा केल्यावर, त्याने हा तांदूळ भवानीपेठ येथील झोपडपट्टीमध्ये भरला असल्याचे सांगितले़ खडक पोलिसांनी टेम्पोसह तांदूळ जप्त केला़
पोलीस कोठडीत रवानगी
४जप्त करण्यात आलेला तांदूळ शासकीय योजनेतील असून, तो महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी त्याचा आहार बनवून त्याचे वाटप करण्याकरिता महिला बचत गटांकडे देण्यात आला होता़ आरोपींनी संगनमत करून, स्वत:च्या फायद्यासाठी रामलाल चौधरी याच्या मार्फत विकला. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून बॅगा जप्त करायच्या आहेत. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. भोसले यांनी दोघांना १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Nutrition Disease Risk Disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.