मिरवडीत उभारली पोषण गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:43+5:302021-09-12T04:13:43+5:30
मिरवडी (ता. दौंड) येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत ''राष्ट्रीय पोषण माह''पोषण गुढी उभारण्यात आली होती. या वेळी ...
मिरवडी (ता. दौंड) येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत ''राष्ट्रीय पोषण माह''पोषण गुढी उभारण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी पोषण गुढी उभारून पूरक पोषण आहाराचे प्रदर्शन आयोजित करुन महिला व किशोरवयीन मुलींना आहार,आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.महिलांची हिमोग्लोबीन तपासणी देखील करण्यात आली.
गटविकास अधिकारी येळे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीनी नागरिकांसाठी आरोग्य,शिक्षण,पाणी,वीज या भौतिक सुविधांची पूर्तता करण्यावर भर देणे गरजेचे असून मिरवडी ग्रामपंचायतीचे नवोपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
या वेळी विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, विद्याधर ताकवणे,सरपंच सागर शेलार,उपसरपंच शांताराम थोरात,कल्याणी कोंडे,प्रवीण कोंडे,अजीस शेख,सतीश मल्लाव,बाळासाहेब ढवळे,मुख्याध्यापक अमर खेडेकर,अंगणवाडी पर्यवेक्षक,परिसरातील अंगणवाडी सेविका,वैद्यकीय कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी,यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.
110921\img-20210908-wa0020__01.jpg
सोबत फोटो ओळी.
मिरवडी (ता.दौंड) येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी अजिंक्य येळे.