शिरूर ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांना पौष्टिक अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:23+5:302021-05-13T04:11:23+5:30
जागतिक परिचारिका दिनानिमित्त आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे तुषार पाटील, ॲक्टिव्ह सोशल ...
जागतिक परिचारिका दिनानिमित्त आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे तुषार पाटील, ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या कामिनी बाफना आदी उपस्थित होत्या.
ॲक्टिव्ह ग्रुपचा वतीने ग्रामीण रुग्णालयातील २५ परिचारिकांना खजूर, लापशी भरडा, बिस्कीट व अन्य पौष्टिक खाद्यपदार्थाचे किट देण्यात आले.
या वेळी कामिनी बाफना म्हणाल्या की, कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत, परिचारिका ही महत्त्वाची भूमिका बजावित असून या सर्वांच्या विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. तुषार पाटील म्हणाले की, परिचारिकांच्या आरोग्याचा काळजी घेण्याचा ॲक्टिव्ह सोशल ग्रुपचा उपक्रम कौतुकास्पद आहे, पौष्टिक आहाराच्या वस्तूचे किट दिल्याबद्दल आभार मानले. समाज आपल्या कामाची दखल घेत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी अपर्णा शहा, मेघा भळगट, सपना बोरा, प्रीती बोरा, मंगल संचेती, प्रिया गुंदेचा, मनीषा नहार, भाव्या बाफना आदी उपस्थित होत्या.