गुलाबी थंडी पिकांसाठी ठरतेय पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:51 PM2018-11-14T22:51:14+5:302018-11-14T22:51:38+5:30
खेड व शिरूरचा पश्चिम भाग : रब्बीच्या पिकांना मिळणार दिलासा
शेलपिंपळगाव : आकाशातील ढगाळ वातावरण नाहीसे होऊ लागल्याने हवामानातील दमटपणा दूर होऊन पहाटे-पहाटे बोचऱ्या थंडीची चाहूल लागू लागली आहे. परिणामी रब्बी हंगामातील बहुतांशी सर्वच पिकांच्या वाढीसाठी ही थंडी लाभदायी ठरत आहे. दमट हवामानाचा रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम होऊन रोगराई गतिशील बनू लागली होती. त्यामुळे रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांना रासायनिक औषधांचा डोस द्यावा लागत होता. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचे आगमन होऊ लागल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.
खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान व भामा-आसखेड धरणातील पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढत आहे. विशेषत: या हंगामात कांदा, हरभरा, ज्वारी, मका, फुलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. मात्र बहुतांशी सर्वच पिकांना ढगाळ वातावरणामुळे उष्ण हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत होता.
चालू वर्षी खरीप हंगामात दूषित हवामानाशी दोन हात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकºयांवर ओढावली होती. खरिपानंतर रब्बी हंगामातील पीक उत्पादनावर शेतकºयांची मदार असून रब्बीची पिके फुलविण्यात ते अधिक मेहनत घेत आहेत. गेल्या महिन्यापासून हवामानात प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे रब्बीच्या पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले होते.
४सध्या रात्रीच्या वेळी हवामानात गारवा निर्माण होऊन बोचरी थंडी जाणवू लागली आहे. थंडीचे आगमन शेतकºयांच्यादृष्टीने आंनदायी वार्ता आहे. थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होऊन पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होणार आहे. ज्वारी, हरभरा, तसेच प्रमुख कांदापिकासाठी थंडी अधिक फायदेशीर ठरणार आहे.
पोषक थंडी...
४खेड तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दोन धरणांमधील शिल्लक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. मात्र मागील दिवसांत पिकांना हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
४सध्या वातावरणात तयार होत असलेला थंडावा पिकाला पोषक ठरू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे कांद्याची पात टवटवीत होण्यास, तसेच पिकाची जलद वाढ होण्यास अधिक मदत होणार आहे.
तोडणीच्या पिकांनाही फायदा...
रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवड, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे. परंतु तोडीव पिकांना रोगराईचा फटका बसला आहे.
थंडीच्या आगमनाने ही पिके पुन्हा एकदा टवटवीत होणार आहेत.
शेतकºयांना काहीसा दिलासा मिळत आहे.