उपद्रवी परदेशी जैविक घटकांबाबत जनजागृतीची रायरेश्वरावर घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:22+5:302020-12-16T04:28:22+5:30

-- भोर : हिंदवी स्वराज्या स्थापनेसाठी शिवबाने ज्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली त्याच रायरेश्वरच्या मंदिरात भोरसह पुण्यातील अनेक संस्था ...

Oath taken on Rayareshwar to create awareness about harmful foreign biological elements | उपद्रवी परदेशी जैविक घटकांबाबत जनजागृतीची रायरेश्वरावर घेतली शपथ

उपद्रवी परदेशी जैविक घटकांबाबत जनजागृतीची रायरेश्वरावर घेतली शपथ

Next

--

भोर : हिंदवी स्वराज्या स्थापनेसाठी शिवबाने ज्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली त्याच रायरेश्वरच्या मंदिरात भोरसह पुण्यातील अनेक संस्था संघटनांनी एकत्र येत नवी शपथ घेतली. ही शपथ होती तीउपद्रवी परदेशी जैविक घटकांना रोखण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी सदैव झटत राहणे याची.

यावेळी रायरेश्वराच्या मंदिरात सोमवारी सोमवती अमावस्या/कार्तिकी अमावस्या) रोजी हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री रायरेश्वर मंदिर (किल्ले रायरेश्वर, ता.भोर, जि. पुणे) येथे अनेक संस्था संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत शपथ घेतली. त्यामध्ये उपद्रवी परदेशी जैविक घटकांबाबत (परदेशी वनस्पती, कीटक मासे, सूक्ष्मजीव) योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी, ह्या हेतूने प्रतीकात्मक दृष्टीने श्री रायरेश्वर मंदिरात उपद्रवी जैविक आक्रमणाविरोधात सांघिकरित्या शपथ, माबि प्रतिज्ञा घेतानाच श्री रायरेश्वर मंदिराच्या आवारात अजानवृक्षाचे योगवल्लीचे रोपण केले. यावेळी शिवसुमन प्रतिमेचे व हरित पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय वनअधिकारी श्रीमती आशा भोंग, वनपरिक्षेञ अधिकारी दत्तात्रय मिसाळ, डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. किशोर भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सचिन पुणेकर,पराग शिळीमकर.सचिन देशमुख, समीर घोडेकर, सुनील जंगम, दिपक घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, गणेश मानकर, शैलेंद्र पटेल, दिलीप शिंदे व माबि सदस्यांसह केली.

हा कार्यक्रम मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) बायोस्फिअर्स श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, आम्ही भोरकर संस्था, राजश्री कान्होजी जेधे-नाईक देशमुख ट्रस्ट, सह्याद्री सर्च अँड रेस्क्‍यू फोर्स, भोर वन विभाग, पुणे वनवृत्त, पर्यावरण विभाग, भारतीय मजदूर संघ, सरदार संताजी घोरपडे प्रतिष्ठान, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्टान, विर धाराऊ माता गाडे ट्रस्ट, शिलेदार प्रतिष्ठान, सरदार कुष्णाजी बांदल प्रतिष्ठान व हिरडस निसर्गसंवर्धन संस्था, कुष्णाई जनसेवा संस्था, सरदार कान्होजी जेधे प्रतिष्ठान, सरदार तानाजी मालुसरे प्रतिष्ठान, सरदार संभाजी कावजी कोंढाळकर प्रतिष्ठान, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, छत्रपती शंभूराजे परिवार, सरदार येसाजी कंक प्रतिष्ठान, मावळ जवान संघटना, रोहिडा शिवजयंती उत्सव समिती, इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झाला.

--

चौकट

,हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्या काळी असलेली सरदार घराणी, १२ मावळातील सहकारी मावळे (जेधे, कंक, घोरपडे, मालुसरे, बांदल, मोहिते, जंगम, शिळीमकर, खोपडे, गाडे-पाटील, देशपांडे, जगताप, गोळे, मिसाळ, मानकर, चिकने, साळेकर, कोंढाळकर, थोपटे, पासलकर, काकडे, सणस, मरळ, गरुड, मुदगल, गुप्ते, डबीर, बलकवडे, ढमढेरे, पायगुडे, गायकवाड, कोंडे-देशमुख, गुजर, शिर्के, काशीद, महाले इ.) यांचे प्रतिनिधी वारसदार उपस्थति होते.

---

Web Title: Oath taken on Rayareshwar to create awareness about harmful foreign biological elements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.