ओबीसी आणि मराठा आरक्षण धोक्यात : राहुल कुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:22+5:302021-06-28T04:08:22+5:30
पाटस ( ता. दौंड ) भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी प्रतीकात्मक चक्का जाम आंदोलन झाले. या वेळी कुल बोलत ...
पाटस ( ता. दौंड ) भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी प्रतीकात्मक चक्का जाम आंदोलन झाले. या वेळी कुल बोलत होते. जनतेच्या हितासाठी आंदोलने करावे लागते, ही दुर्दैवाची बाब आहे. परिणामी आघाडीचे सरकार सर्वदृष्टीने अपयशी ठरले आहे. ओबीसी तसेच मराठा आरक्षणासाठी शासनाकडे बाजू मांडण्यासाठी कमी पडणार नाही, असे शेवटी कुल म्हणाले. याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले की आघाडी सरकारने ओबीसी समस्यांकडे पाठ फिरवली आहे. तेव्हा ओबीसी आरक्षणासाठी या सरकारला धारेवर धरल्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी आघाडी सरकारमधील खंडणीखोर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे , बापूराव भागावत, यशवंत खताळ,माऊली शेळके, वसंत साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते आणि मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलकांनी काळ्या फिती लावून आघाडी सरकारचा निषेध केला. या वेळी आंदोलकांच्या वतीने नायब तहसीलदार सचिन आखाडे यांना निवेदन देण्यात आले.
पाटस येथे भाजपा आंदोलनात बोलताना आमदार राहुल कुल.