ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज, तळेगाव ढमढेरेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:33+5:302021-07-14T04:13:33+5:30
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, ओबीसी काँग्रेसचे ...
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, ओबीसी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष सचिन नरके, स्वप्निल शेलार, श्रीकांत नरके यांनी केले होते. याप्रसंगी शिरूर हवेलीचे माजी आमदार पोपटराव गावडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, रामकृष्ण बिडगर, काळूराम ठोंबरे, सावता परिषदेचे अध्यक्ष गोरक्ष भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ कुदळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके, ग्रामपंचायत सदस्य अॅड. सुरेश भुजबळ, माजी सदस्य महेश भुजबळ, नवनाथ भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे, ओबीसी समाजाची आजची परिस्थिती तसेच भविष्यातील वाटचाल करत असताना ओबीसी समाजाला आरक्षणाची असलेली गरज याविषयी चर्चा करण्यात आली. आज राजकीय आरक्षण जात असेल तर उद्या शैक्षणिक आरक्षणदेखील जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात अनेक पालकांना व विद्यार्थ्यांनाही नुकसान होईल. त्यामुळे समाजाच्या सतर्कतेसाठी ओबीसी जागा हो घोषणेने सदर बैठक घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
तळेगाव ढमढेरे येथे ओबीसी आरक्षणासाठी आयोजित बैठकीत उपस्थितीत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते.