सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द: हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:24+5:302021-06-27T04:08:24+5:30
भिगवण : राज्यांमध्ये स्थापन झालेले अनैसर्गिक सरकार ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्यामुळे व सरकारच्या अक्षम्य नाकर्तेपणामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील ...
भिगवण : राज्यांमध्ये स्थापन झालेले अनैसर्गिक सरकार ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्यामुळे व सरकारच्या अक्षम्य नाकर्तेपणामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण हा ओबीसी समाजाचा हक्क आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होईपर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, चौफुला येथे सुमारे तासभर इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. चक्का जाम आंदोलनासाठी तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, अशोक वणवे, कृष्णाजी यादव, अशोक शिंदे, संजय देहाडे, तानाजी वायसे, पराग जाधव, यशवंत वाघ,
संपत बंडगर, रणाजित भोंगळे, प्रशांत वाघ, संदीप खुटाळे, तेजस देवकाते, संजय जगताप, माउली मारकड,दिनानाथ मारणे,हनुमंत काजळे, अभिमन्यू खटके, जयदीप जाधव, कपिल भाकरे,अशोक पाचांगणे,
संजय भरणे, जावेद शेख आदी उपस्थित होते. या वेळी आंदोलनामुळे मदनवाडी, चौफुला येथे चक्का जाम केला त्यामुळे बारामती अहमदनगर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील अनैसर्गिक सरकार मराठा, धनगर, ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नाही. मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले, तर धनगर आरक्षणाबाबत हे सरकार एक शब्दही बोलत नाही अशी स्थिती आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सरकारला सुचित करूनही सरकारने ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी
आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी शासनाचे लगेच निवडणुका जाहीर करून ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार केले आहे.
ओबीसींना न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही.
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे ॲड. शरद जामदार, मारुती वणवे, श्रीमंत ढोले, माऊली चवरे, गजानन वाकसे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता
पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत
करावा, ओबीसी समाजाची
जातनिहाय जनगणना करावी, आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका रद्द कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन पोलीस व महसूल
प्रशासनास देण्यात आले.
प्रास्ताविक इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे यांनी केले, तर आभार भाजप कामगार आघाडीचे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे यांनी मानले.