सुप्यात ओबीसीच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:07+5:302021-07-21T04:09:07+5:30
सुपे : ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आल्याने बारामतीमध्ये होणाऱ्या २९ जुलैच्या ओबीसीच्या एल्गार मोचार्संदर्भात सुपे येथे ओबीसी आरक्षण बचाव ...
सुपे : ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आल्याने बारामतीमध्ये होणाऱ्या २९ जुलैच्या ओबीसीच्या एल्गार मोचार्संदर्भात सुपे येथे ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृती समितीच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, अॅड. गुलाबराव गावडे, मच्छिंद्र टिंगरे, गोविंद देवकाते आदींनी मार्गदर्शन करीत येत्या २९ जुलै रोजी होणाऱ्या एल्गार मोचार्ची दिशा ठरविण्यात आली. बारामतीमध्ये येत्या २९ जुलै रोजी होणाऱ्या एल्गार मोर्चा संदर्भात माहिती देण्यात आली. त्यामुळे गावोगावी जाऊन ओबीसी समाजाची वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
ओबीसी समाजाचे गेलेले हक्कचे आरक्षण मिळविण्यासाठी ही लढाई महत्वाची ठरणार आहे. ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थाचे राजकीय आरक्षण गेले आहे. त्यामुळे पुढे सरकार शैक्षणिक आणि नोकरीचे आरक्षणही घालवतील. यासाठी जागृत राहुन येणाºया काळात ओबीसी समाज एकवटला पाहिजे. तरच सुप्रीम कोटार्तुन आरक्षणाची पुरतता होईल. त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घेणे आवश्यक आहे तरच याचा लाभ भावी पिढीला मिळणार आहे. ओबीसी समाज हा पिढ्या न पिढ्या मागास राहिला आहे. त्याच्या विविध मागण्यांकडे सरकारने निव्वळ दुर्लक्षच केले आहे. ही विषमता दूर करण्यासाठी येत्या २९ जुलैला होणाऱ्या बारामतीतील एल्गार मोर्च्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे या बैठकीत ठरविण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. के. हिरवे, समता परिषदेचे अशोक लोणकर, अनिल हिरवे, तुषार हिरवे, वसिम तांबोळी, पोपट धवडे, गोविंद देवकाते, समता परिषदचे शहराध्यक्ष प्रदीप लोणकर, सचिन भुजबळ, सचिन बारवकर, वसिम तांबोळी आदींसह ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
----------------------------