Pune Municipal Corporation: हरकती व सूचना क्षेत्रिय कार्यालयातही दाखल करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 07:03 PM2022-02-01T19:03:11+5:302022-02-01T19:03:39+5:30

महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत.

Objections and suggestions can also be lodged at the field office Pune Municipal Corporation | Pune Municipal Corporation: हरकती व सूचना क्षेत्रिय कार्यालयातही दाखल करता येणार

Pune Municipal Corporation: हरकती व सूचना क्षेत्रिय कार्यालयातही दाखल करता येणार

Next

पुणे : शहरातील ५८ प्रभागांचे प्रारूप नकाशे आज (मंगळवार दि़१ फेब्रुवारी) नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आले असून, या प्रारूप नकाशावर नागरिकांना १४ फेब्रुवारीपर्यंत आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 

महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत. महापालिकेच्या विस्तारित इमारतीत तिसऱ्या मजल्यावर व सर्व क्षेत्रिय कार्यालयात त्या-त्या ठिकाणच्या प्रभागांचे नकाशे प्रसिध्द करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही हे नकाशे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. 

या प्रारूपवर नागरिकांकडून सोमवार दि़ १४ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सुचना स्विकारल्या जाणार आहेत. त्यानंतर १६ फेबु्रवारीला निवडणुक आयोगाकडे या हरकती व सूचना सादर करण्यात येईल व २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांवर सुनवणी होणार आहेत.  त्यानंतर बुधवार दि़ २ मार्च रोजी शहरातील अंतिम प्रभाग रचना जाहिर होईल. 

Web Title: Objections and suggestions can also be lodged at the field office Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.