हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील स्पा मधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:13 PM2022-01-10T14:13:03+5:302022-01-10T14:22:45+5:30
हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला
पुणे : डेक्कन जिमखान्यावरील एका स्पामध्ये आलेल्या तरुणीच्या मानेचा मसाज करताना तेथील कर्मचार्याने लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंदार साळुंखे या कर्मचार्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेल्या होत्या. तेथे काम करणारा मंदार साळुंखे या कर्मचारी तिच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. तसेच अंगाला जाणीवपूर्वक नको तेव्हा हात लावून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.