मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात

By नितीश गोवंडे | Published: August 29, 2022 04:44 PM2022-08-29T16:44:59+5:302022-08-29T16:45:15+5:30

पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार

Obstacles of restrictions removed in Pune Seven and a half thousand policemen have been deployed for Ganeshotsav | मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात

मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात

googlenewsNext

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवांची एक परंपरा असून, दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी साडेसात हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके मिरवणुकीत ठेवावीत यावर निर्बंध असणार नाही अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, राहुल श्रीरामे, ए.राजा उपस्थित होते यांची उपस्थिती होती. पुण्यात बंदोबस्तासाठी बीडीडीडी पथके, क्यू आर टी चे अधिकारी, अंमलदार तैनात करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी एकूण १७०९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

गणेशोत्सव काळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलिस मित्र समिती यांच्या आयुक्त, परिमंडळीय पोलिस उप-आयुक्त, पोलीस स्टेशन स्तरावर एकूण ६९ बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या.

आगीचा लोळ निर्माण करणेस बंदी..

गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीमध्ये ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ उत्पन्न करतात किंवा हवेत सोडतात. यंदा कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करणेस किंवा हवेत सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवात पहिल्या आणि शेवटच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

Web Title: Obstacles of restrictions removed in Pune Seven and a half thousand policemen have been deployed for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.