अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:47+5:302021-05-11T04:09:47+5:30

(प्रशांत ननवरे) बारामती : लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बारामतीत लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. बारामतीत दोन्ही केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावत ...

Obstruction of vaccination due to insufficient supply | अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचा बोजवारा

अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचा बोजवारा

googlenewsNext

(प्रशांत ननवरे)

बारामती : लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बारामतीत लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. बारामतीत दोन्ही केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावत मोठी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण होते. बराच वेळ थांबूनही लस न मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. लसीकरण केंद्रावर हे चित्र नित्याचेच झाले आहे. शिवाय, ऑनलाईन नोंदणी (ओपन) सुरू झाल्यावर अवघ्या चार ते पाच मिनिटांत १०० जणांची नोंदणी पूर्ण होत असल्याने आरोग्य प्रशासन देखील चक्रावले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध न झाल्याने कोरोनाला रोखणार तरी कसे, हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. आता पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्याची वेळ आली आहे.

बारामती शहर आणि तालुक्यात अपुऱ्या लसपुरवठ्यामुळे सध्या ११ केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. ६ ते ९ मेपर्यंत लस न मिळाल्याने लसीकरण बंद होते. १० मेपासून लसीकरण अखेर सुरू झाले आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी केवळ महिला रुग्णालयात आणि ग्रामीण भागात होळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ या दोनच ठिकाणी प्रत्येकी १०० नागरिकांना लस दिवसाला मिळणार आहे. त्याचा लसीकरणावर विपरीत परिणाम झाला आहे. आजपर्यंत एकूण ९७ हजार २३७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, नागरिकांनी लसीकरण करण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लसीकरणासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी ग्राह्य धरली जाते. या वयोगटासाठी ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ची सोय नाही. ऑनलाईन नोंदणी (ओपन) सुरू झाल्यावर अवघ्या चार ते पाच मिनिटांत १०० जणांची नोंदणी पूर्ण होते. ही नोंदणी पूर्ण झाल्यावर पुढील नोंदणी अ‍ॅपवर घेतली जात नाही. अ‍ॅपवर नोंदणी झालेल्या १०० जणांची यादी आरोग्य विभागाला पाठविण्यात येते. त्यानंतर त्याच १०० जणांना लसीकरण करण्यात येते. ही यादी रुग्णालयाबाहेर रोज लावण्यात येते. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी यशस्वी झाल्याचा अनेकांना ‘मेसेज’ येतो. मात्र,याच ठिकाणी अनेकांची गफलत होते. नोंदणी करणाऱ्यांना दिवस आणि तारीख मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा ‘स्लॉट’ मिळाल्यांनतरच सबंधितांनी लसीकरणासाठी यावे.

४५ वर्ष वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी आलेली लस ३६ लसीकरण केंद्रांमध्ये विभागून देण्यात येते. खासगी लसीकरण केंद्रांला सध्या लस पुरविणे शक्य नाही. यामध्ये देखील केंद्र शासनाने दुसऱ्या डोससाठी आलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच ७० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना, तर ३० टक्के डोस प्रथम डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना देण्यात येत आहे. यामध्ये देखील ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांनाच लसीकरणास प्राधान्या देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. दुसऱ्या डोससाठी नागरिकांना ऑनलाईनची गरज नाही. त्यांना पहिल्या डोसच्या वेळीच नोंदणी केली आहे. त्यामुळे महिला रुग्णालयात सकाळी ९ वाजता पहिल्या ७० नागरिकांना टोकन देण्यात येते. मात्र, यावेळी संख्या अधिक असल्याने वाद होतात. ७० च्या पुढील नागरिकांना रांगेत थांबू नये. तर दररोज प्रथम डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील ३० नागरिकांना देण्यात येत आहे. यातून ३० डोससाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत.त्यामुळे ११ वाजता ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकाला आत घेतल्यास रांगेत थांबलेले नागरिक वाद घालतात. त्यामुळे ऑनलाईन ‘प्रॉपर’ पध्दतीने केलेल्या नागरिकांनाच लसीकरणाला प्राधान्य देण्यात येते. या वेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या यादीतील एखादा नागरिक अनुपस्थित असल्यास रांगेतील इतरांचा विचार होतो. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे. दुसरा डोस पूर्ण केल्याशिवाय पुढील लसींचा पुरवठा केला जाणार नसल्याची केंद्र सरकारने सूचना दिली असल्याचे डॉ. खोमणे म्हणाले.

———————————————

...यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका

सोमवारी चार तास रांगेत थांबलेल्या स्मिता पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि ,मी पहिली लस खासगी रुग्णालयात घेतली आहे. मात्र, लस नसल्याने ते केंंद्र बंद आहे.त्यामुळे दुसºया डोससाठी शासकिय रुग्णालयात यावे लागले. मात्र,या ठीकाणी लसीकरण प्रक्रियेबाबत कोणीहि माहिती दिली नाहि.नियोजन नसल्याने मोठी गर्दी होते.यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सोमवारी(दि १०) लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती.मात्र,१५ दिवसांपुर्वी टोकण दिलेल्या नागरीकांनाच लस देणार असल्याचे सांगण्यात आले.मी गेल्या सात आठ दिवसांपासुन येथे येत आहे,मला हे टोकन मिळालेले नाहि.वरीष्ठ पातळीवर विचारणा केल्यावर लसीकरण सुरु होवुन मला दुसरा डोस मिळाला.मात्र,रक्तदाब,मधुमेहाचा त्रास असणारे अनेक ज्येष्ठ नागरीक तासंतास रांगेत असतात.याबाबत शासनाने विचार करावा,ज्येष्ठांना घरी जावुन लसीकरण करण्याची गरज आहे.त्यासाठी शक्य असेल त्यांच्याकडुन शुल्क देखील शासनाने घ्यावे,असे पडळकर म्हणाल्या.

फोटोओळी—बारामतीत सोमवारी नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.

(फोटो पुणे कार्यालयात मेल केला आहे.

१००५२०२१ बारामती—०१

१००५२०२१ बारामती—०२

———————————————

Web Title: Obstruction of vaccination due to insufficient supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.