अहिल्यादेवी जयंतीनिमित्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:49+5:302021-06-02T04:09:49+5:30
अहिल्यादेवी जयंतीनिमित्त वृक्ष वाटप, रक्तदान शिबिर बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात शहर पोलीस ...
अहिल्यादेवी जयंतीनिमित्त
वृक्ष वाटप, रक्तदान शिबिर
बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात शहर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या वेळी पिंपळी गाव कोरोनामुक्त केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव केसकर यांच्या वतीने पिंपळीतील कोरोना योद्धे पिंपळी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. दीपाली शिंदे, आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदींचा सत्कार स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला.
तसेच तरुण वर्ग मुंबई पोलीस शरद केसकर, बापू केसकर, अमोल केसकर, सचिन केसकर, संदीप केसकर आदींच्या वतीने रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच जयंतीनिमित्ताने २९६ झाडांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच नितीन देवकाते, तुषार थोरात, रणजित देवकाते, सूरज बनकर, अजित देवकाते, महादेव केसकर, संतोष केसकर, प्रताप केसकर, संदीप केसकर, सोनू चोरमले,हनुमंत देवकाते,सचिन देवकाते,स्वप्नील देवकाते,अमोल देवकाते आदी तरुण युवकांनी केले.
या वेळी कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील, बारामती खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष भाऊसो भिसे, बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनील बनसोडे, सरपंच मंगल केसकर,उपसरपंच राहुल बनकर, पोलीस पाटील मोहनराव बनकर, पिंपळीचे तलाठी तेजस्वी मोरे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,विविध अशोकराव देवकाते, विकास बाबर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील केसकर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब बनसोडे यांनी केले.
———————————————————