लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:52 AM2018-12-28T01:52:15+5:302018-12-28T01:52:53+5:30

वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

On the occasion of the anniversary of the Lokmat, today we will get admission in Mahavir Jain School | लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा

लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा

Next

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘ब्रॅँड पुणे - जनरेशन नेक्स्ट’चा गजर करीत पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासन, उद्योग, व्यापार, जाहिरात आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा होईल.
पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करून ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्या. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास!’, ‘कशासाठी? पुण्यासाठी’ यासारख्या मोहिमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्याकरिता ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यासारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिलांच्या सन्मानाची चळवळच बनली आहे.
यंदाच्या वर्धापन दिनाची ‘लोकमत’ची संकल्पना ‘ब्रॅँड पुणे-जनरेशन नेक्स्ट’ ही आहे. पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. देदीप्यमान इतिहास, सामाजिक चळवळींनी घडविलेली नवी वाट, शिक्षणाच्या प्रकाशातून ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ अशी मिळविलेली ओळख, व्यापार-उद्योगातील कर्तृत्वातून झालेली प्रगती, साहित्य-कला-संस्कृतीच्या जपणुकीतून मिळालेले सांस्कृतिक राजधानीचे बिरुद ते आजचे शांत, सुरक्षित, प्रगतिशील, कॉस्मोपॉलिटन पुणे या सगळ्या प्रवासात सर्वांचाच हातभार लागला आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘ब्रॅँड पुणे’ ही मोहीम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक प्रशांत दीक्षित आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़

महावीर जैन विद्यालयात जैन मंदिरासमोर पार्किंगची व्यवस्था
‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्यानिमित्त येणाऱ्या मान्यवरांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था महावीर जैन विद्यालयातीलच जैन मंदिरासमोरील जागेत करण्यात आली आहे. बीएमसीसी रस्त्यावरून महावीर जैन विद्यालयाच्या कमानीतून आल्यावर डाव्या बाजूच्या मैदानावर मुख्य सोहळा रंगणार आहे. पार्किंगची व्यवस्था उजव्या बाजूला असणाºया जैन मंदिरासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे.

Web Title: On the occasion of the anniversary of the Lokmat, today we will get admission in Mahavir Jain School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत