हुतात्मा विष्णू पिंगळे जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:45+5:302021-01-03T04:12:45+5:30
या वेळी पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे, भाजपा प्रदेश केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, सोसायटीच्या ...
या वेळी पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे, भाजपा प्रदेश केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, सोसायटीच्या संचालिका शोभा हिंगणे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, मुख्याध्यापक बाळासाहेब, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारका कमिटीचे संचालक प्रमोद फुलसुंदर, सुदर्शन तोडकर, सागर दरेकर, संतोष विजय ढमढेरे, रामभाऊ गायकवाड,किरण झुरुंगे,सुरेखा डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीराव भुजबळ म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांनी बलिदान दिले. त्यांचे स्मारक तळेगाव ढमढेरे याठिकाणी शासनाने उभारलेले असून यांची आज २ जानेवारी रोजी जयंती असतानाही कोणतेही प्रशाासन अधिकारी मानवंदना देण्यासाठी फिरकले नाहीत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विसर पडतोय ही दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
०२ तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे येथे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना आदरांजली वाहताना ग्रामस्थ.