गणेशोत्सवानिमित्त चिमुकल्यांनी खुलविले बालगणेशाचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:34+5:302021-09-10T04:16:34+5:30
कोरोनाकाळातही मुलांचा उत्साह कायम राहावा आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने विद्यालयात गणपती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...
कोरोनाकाळातही मुलांचा उत्साह कायम राहावा आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने विद्यालयात गणपती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग व जलरंगाचा वापर करुन आपल्या लाडक्या बाप्पाचे रुप खुलविले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी गटनिहाय क्रमांक मिळवले.
स्पर्धेचे परीक्षण सुरेश बांगर, वैशाली काळे, राजेंद्र अरगडे, संजय वळसे, वंदना मंडलिक, कविता ढेरंगे,लक्ष्मी वाघ यांनी केले. स्पर्धेच्या नियोजनामध्ये संतोष पिंगळे, सुभाष साबळे, गुलाब बांगर, लक्ष्मण फलके व सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे व वरिष्ठ अधिकारी अमरजित खराडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
--
चौकट
स्पर्धेचा निकाल असा : लहान गट- प्रथम जान्हवी, उमेश झोडगे. द्वितीय -साईराज प्रविण लोहकरे, तृतीय- शिवप्रसाद विठ्ठल मोरे, उत्तेजनार्थ -ऋग्वेद नंदकिशोर काळे, मोठा गट- प्रथम अनुष्का कैलास कोळप, द्वितीय - ऋतुजा सुधीर मिडगे, तृतीय- ईश्वरी विठ्ठल मोरे, उत्तेजनार्थ -तनुजा सुधाकर सोमवंशी यांना मिळाले.
--
०९घोडेगाव रंगभरण स्पर्धा
रंगभरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक