वाढत्या कोरोनाबाधितांमुळे अवसरीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:54+5:302020-12-23T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पंधरा दिवसात कोविडचे रुग्ण वाढले आहे. अवसरी खुर्द ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पंधरा दिवसात कोविडचे रुग्ण वाढले आहे. अवसरी खुर्द गावात ३६ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे खबरचारीचा खबरदारीचा उपाय म्हणून अवसरी खुर्द गाव मंगळवार दि. २२ ते दि. २५ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. बंद काळात गावात येवू नये असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आर.टी.गाढवे यांनी केले आहे.
अवसरी खुर्द येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा उस्तवानिमित्त गावात कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ठराविकच कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे सप्ताह काळात किर्तनाच्या ऐवजी दररोज स्थानिक भजनकरी मंडळी यांनीच भजनाचा कार्यक्रम केला. देवजन्माचे दिवशी फक्त एक तासाचे किर्तन झाले. मात्र दुसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी ग्रामस्थांची ये-जा वाढल्याने अवसरी खुर्द गावात ४० कोविड रुग्ण सापडल्याने गावातील आठवडे बाजार व गाव बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. मागणीचा विचार करून व गावात कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून अवसरी खुर्द गाव मंगळवार पासून शुक्रवार पर्यंत बंद राहणार आहेत. बंद दरम्यान अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी आर.टी.गाढवे यांनी दिली.
फोटो : अवसरी खुर्द गावात ग्रामस्थांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.