इंदापूरच्या पश्चिम भागात ओढे, नाले तुडुंब
By Admin | Published: June 6, 2016 12:34 AM2016-06-06T00:34:54+5:302016-06-06T00:34:54+5:30
इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.४) रोजी झालेल्या पावसाने इंदापूर तालुक्यात
लासुर्णे : इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.४) रोजी झालेल्या पावसाने इंदापूर तालुक्यात उच्चांक गाठला आहे. यामध्ये अंथुर्णेत सर्वाधिक ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सलग तीन वर्षे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत असताना २५ मेपासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले. हे नक्षत्रा कोरडे जाते की, काय अशी भीती शेतकऱ्यांना लागली होती. अशातच या नक्षत्राात पावसाने शुक्रवारी व शनिवारी दमदार हजेरी लावल्याने इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडूंब वाहू लागले आहेत.
मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच यामुळे बळीराजा सुखावला आहे. शनिवारी (दि. ४) रोजी पडलेल्या पावसाची नोंद इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात उच्चांकी झाली आहे. यामध्ये अंथुर्णे ८० मि.मी., निमगाव केतकी ४५ मि.मी., बावडा ३५ मि.मी. अशी झाली असल्याने इंदापूरच्या पश्चिम भागात पावसाची नोंद उच्चांकी झाली आहे. सध्या राज्यात दुष्काळाची दाहकता असल्याने बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट दिसून येत होते.
शिरूर : शहर व परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाने आज संध्याकाळी पुन्हा हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बोऱ्हाडे मळा परिसरात झाड उन्मळून पडले, तर काही घरांचे पत्रे उडून गेले. काल (दि.४) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारासही वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आठवडाभरात चौथ्यांदा पाऊस झाला.
चार दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावली. त्यानंतर परवा पुन्हा पाऊस झाला. काल रात्री दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा होता. मात्र, दिवसा पाऊस झाला नाही. मध्यरात्री दीडच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अर्धा तास हा पाऊस झाला. आजही आकाशात ढगाळ वातावरण होते. शहरात १० मिनिटातच पाऊस थांबला, मात्र वादळी वाऱ्यासह बोऱ्हाडे मळा परिसरात झालेल्या पावसाने झाडे उन्मळून पडले, तर अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले.