आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:19 AM2018-05-05T03:19:35+5:302018-05-05T03:19:35+5:30

आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 Offender's offense for filing felony offense, NCP office bearer, activist aggressive | आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

Next

इंदापूर / लासुर्णे : आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
बबलू पठाण (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष गणेश भोंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते.
याबाबत हकीकत अशी : आज दुपारी आरोपी पठाण याने सोशल मीडियाने आमदार भरणे यांच्याबद्दल अपमानकारक लिखाण करून त्यांची बदनामी केल्याची बाब गणेश भोंग यांच्या लक्षात आली.
याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, गजानन गवळी, नवनाथ रूपनवर, महादेव व्यवहारे, अण्णा वाघमोडे यांना कल्पना दिली.
या सर्वांच्या सह्यांचे निवेदन तयार करून ते पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्याकडे दिले. आरोपी पठाण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना भोंग म्हणाले, की आरोपी पठाणवर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. तिची पूर्तता झाली नाही, तर आंदोलनात्मक पवित्रा उचलला जाईल.
दरम्यान, आरोपीवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासानंतर योग्य ते पाऊल उचलले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी पत्रकारांना दिली.

Web Title:  Offender's offense for filing felony offense, NCP office bearer, activist aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.