नवविवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:36 AM2019-04-01T03:36:01+5:302019-04-01T03:36:27+5:30
महागड्या वस्तूंसहित थाटामाटात दिले होते लग्न लावून
पुणे : धनकवडी येथील सौदागर सोसायटीत राहणाऱ्या नवविवाहित महिलेने पती, सासू व सासरे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याल आला आहे. सविस्तर वृत्तानुसार तक्रारदार नवविवाहित महिलेचा सागर नागेश जाधव यांच्याशी २ जून २०१५ मध्ये हिंदू विवाह पद्धतीने विवाह झाला होता. या लग्नामध्ये सासरकडील लोकांच्या मागणीनुसार लाखो रुपयांचे दागिने तसेच एक ते दीड लाख रुपयाचे इतर घरगुती साहित्य, एसी वॉशिंग मशीन इत्यादी तसेच मागणीनुसार थाटामाटात लग्न लावून दिले.
या महिलेस कोणत्याही प्रकारे मदत न करता जेवण बनवणे किंवा अन्य कारणावरून छळ केला जात होता, तसेच वारंवार फिरायला जाणे किंवा विविध कारणांनी सासरच्या लोकांनी त्रास देत ४ डिसेंबर २०१७ रोजी घरातून हाकलून दिले तसेच दि.१७.१०.२०१८ रोजी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पीडित महिलेच्या वडिलांकडून जबरदस्तीने लिहून घेत, घटस्फोटाचा दावा दाखल करून मानसिक त्रास दिला असल्याची माहिती दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून २६ मार्च १९ रोजी भारतीय दंड सहिता ४९८ ए, ४०६, ३२३, ५०४, ३४ आणि ४ नुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, याबाबत धनकवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सुतार अधिक तपास करीत आहेत.
छळामुळे सुरू झाला मणक्याचा त्रास
४ लग्नानंतर लगेचच विविध कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला असून वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने माहेरून पैसे आणण्यासाठी तसेच माहेरी वरचेवर जाते म्हणून सासू शारदा नागेश जाधव (वय ५९) व नागेश भगवान जाधव (वय ६४) यांच्याकडून दबाव टाकला जात असे यासाठी फिर्यादीला वारंवार मारहाण केली जात होती. त्यामुळे मणक्याच्या त्रास होऊ लागला.