हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

By भाग्यश्री गिलडा | Published: August 11, 2023 12:05 PM2023-08-11T12:05:45+5:302023-08-11T12:44:34+5:30

समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या, अशी तक्रार

Offensive posts about Hindu deities and Mother India A case has been filed against the owner of Facebook | हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे: हिंदू देवतांविषयी आणि भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश काबरे (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सचित शामदत्त एरंडे (वय ३७) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी जगदीश काबरे याने फेसबुक वर जेट जगदीश, जगदीश काबरे, जेके या नावाने अकाउंट उघडले. त्याचा गैरवापर करत बनावट अकाऊंट द्वारे हिंदू देवी देवतांविषयी, महापुरुषांविषयी, साधुसंतांविषयी, तसेच भारत माते विषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यांची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या. अशी तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. विश्रामबाग पोलिसांनी आरोपी जगदीश काबरे यांच्या विरुद्ध कलम २९५(ए) ५०५ भादविसह कलम ६७ (ए) आय टी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दबडे करत आहेत.

Web Title: Offensive posts about Hindu deities and Mother India A case has been filed against the owner of Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.