गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देऊ
By admin | Published: May 13, 2017 04:52 AM2017-05-13T04:52:19+5:302017-05-13T04:52:19+5:30
राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या
लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या सर्वांना इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
फोरमच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गांधी बोलत होते. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे राज्यातील गुंतवणूकदार एकत्र आले. यातून राज्यस्तरावर इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमची स्थापना करण्यात आली.
या लढ्याची व्याप्ती वाढवणे, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून बोगस कंपन्यांवर ठोस कारवाई व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधी यांना विनंती केली असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.
नवीन गुंतवणूकदारांची फवणूक व बोगस कंपन्या निर्माण होऊ नये यासाठी या लढ्यामध्ये खासदार गांधी यांना फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती. या वेळी त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. या फोरमचे सल्लागार म्हणून संजय कांबळे यांची निवड केली आहे.