जय गणेश ! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:43 PM2018-04-18T13:43:09+5:302018-04-18T13:43:09+5:30
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.
पुणे : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे.श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवतालच्या सर्व दिशात हापूस आंबे ठेवण्यात आले आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.
वैशाख शुद्ध तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.काही ठिकाणी हा सण 'आखाती' या नावानेही ओळखला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय म्हणजे कमी न होणारे असते असे मानले जाते. या दिवशी सोने, गाडी, इलेकट्रोनिक वस्तू यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर केले. या दिवसापासून अनेक घरात आंबे खाण्यास प्रारंभ केला जातो. गेली अनेक वर्ष देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून हे आंबे दगडूशेठच्या बाप्पासमोर ठेवले जातात. यंदा मंगळवारी रात्री उशिरा आंबे मांडण्यास सुरुवात करून बुधवारी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण केले गेले. त्यानंतर पहाटे ४ ते ६ यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश याग संपन्न झाला. भक्तांनी पहाटेपासून बाप्पाच्या दरबारी त्याचे पिवळ्याजर्द आंब्यांच्या मधोमध असणारे मनोहारी रूप डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती.