टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे, कर्मचारी अधिका-यांची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:58 AM2018-01-02T01:58:21+5:302018-01-02T01:58:36+5:30

मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच, सुविधांचा अभाव, कर्मचाºयांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

The office of the postal office; | टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे, कर्मचारी अधिका-यांची अनास्था

टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे, कर्मचारी अधिका-यांची अनास्था

Next

चाकण : मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच, सुविधांचा अभाव, कर्मचाºयांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम लवकर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून पुरेसे मनुष्यबळ भरून पोस्टाचा कारभार सुधारण्याची मागणी चाकण परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
औद्योगिक वसाहत, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्यावस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह या भागातील सर्व बँका, पतसंस्था यांचा कारभार तसेच दैनंदिन टपाल, ठेव योजना, बचत योजना, विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. नागरिकांना ताटकळत खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे कामास विलंब होतो, अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांची
खंत आहे.

अडीच लाख वस्तीसाठी मोजके कर्मचारी

शहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहे; मात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत.
चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी तीन अधिकारी व हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आठ-दहा कर्मचारी आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत.
मोबाईलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी शासकीय पत्रे, कंपन्यांचे टपाल, फोन, मोबाईलची बिले, विमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत. त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: The office of the postal office;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.