बहिणीकडे आलेल्या अधिकाऱ्याला 'पहिलवान' ज्येष्ठाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:35 AM2019-11-20T10:35:27+5:302019-11-20T10:41:14+5:30

सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांच्या मदतीने सदर व्यक्तीने सुटका करून घेतली..

The officer who approached the sister was hit by a 'wrestler' senior | बहिणीकडे आलेल्या अधिकाऱ्याला 'पहिलवान' ज्येष्ठाने झोडपले

बहिणीकडे आलेल्या अधिकाऱ्याला 'पहिलवान' ज्येष्ठाने झोडपले

Next
ठळक मुद्देविश्रांतवाडीतील धक्कादायक प्रकार,अदखलपात्र गुन्हा नोंदवलास्थानिक विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे  : बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या मुंबई येथील अधिकाऱ्याला एका विक्षिप्त ' पहिलवान' जेष्ठ नागरिकांने विनाकारण जबरी मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी येथे नुकतीच घडली. सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांच्या मदतीने सदर व्यक्तीने सुटका करून घेतली. मात्र या स्थानिक विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रांतवाडीपोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाचा सोसायटी महिला व इतरांना कायमच त्रास असून सोसायटीच्या वतीने पोलिसांना लेखी तक्रार दिल्याचे समजते. 
याबाबतची माहिती अशी, मुंबई महापालिकेतील कर विभागाचे अधिकारी अरूण रणधीर (वय ५५) हे शनिवारी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी विश्रांतवाडी येथे आले होते. बहिण घरी नसल्याने ते वाट पाहत जिन्यात उभे असताना अचानक समोरून एका अनोळखी ज्येष्ठ नागरिकाने त्यांना हटकले. तू इथे का थांबला?असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रणधीर यांनी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी त्यांना मारहाण करण्यास झोडपले. यावेळी मारहाण करणाºया व्यक्ती सोबत उभ्या असलेल्या दोन महिलांपैकी एकीने त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांना न जुमानता वाद सोडवण्यासाठी आलेल्या कोणाचे काही एक न ऐकता त्यांनी रणधीर यांना थेट  जिन्यातून ढकलून दिले. रणधीर जिन्यावरुन गडगडत खाली कोसळले. सुरक्षारक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रणधीर यांनी सुटका करून घेतली.हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. 
 याप्रकरणी जबरी मारहाण प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. रणधीर यांना वैद्यकीय तपासणीत डोक्याला व पूर्ण अंगाला मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला असून हाताला जखम झाली आहे. सीसीटिव्ही फुटेजसह तक्रार करून देखील विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने रणधीर यांच्या कुटुंबियांनी सांगितले. याप्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना माहिती दिल्यावर मंगळवारी रात्री विश्रांतवाडी पोलिसांना जाग आली. याप्रकरणी त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिली. 
या प्रकरणामुळे जबरी मारहाणीचा गंभीर प्रकार घडून देखील पोलिसांनी केवळ  अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारासाठी चर्चेत असणाºया विश्रांतवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: The officer who approached the sister was hit by a 'wrestler' senior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.