एचओडी बैठकीमुळे सुट्ट्यानंतरही अधिकारी- कर्मचारी ऑन टाईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:43+5:302020-12-30T04:14:43+5:30
पुणे : ख्रिसमससह सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर ही केवळ दर आठवड्याची विभाग प्रमुखांच्या (एचओडी) बैठकीसाठी सकाळी साडे दहा ...
पुणे : ख्रिसमससह सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर ही केवळ दर आठवड्याची विभाग प्रमुखांच्या (एचओडी) बैठकीसाठी सकाळी साडे दहा वाजताच जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी ऑनटाइम उपस्थित होते. त्यामुळे अधिकारी सुटीमुळे सुस्त झाले नसून, कामासाठी अगदी सज्ज असल्याचेच हे चिन्ह दिसून आले.
यंदा ख्रिसमसची सुट्टी शुक्रवारी म्हणजे शनिवार- रविवारला लागून आल्याने सरकारी कर्मचा-यांना सलग तीन दिवस सुट्टी मिळाली. शुक्रवारच्या सुट्टीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये एक-दोन दिवस आगोदरच सुट्टीचा मुड तयार झाला होता. शुक्रवारी दुपारीच अनेकजणांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. तर काहीने कोरोना नंतर प्रथमच फॅमिली सोबत पिकनिक प्लॅन केल्याने दोन दिवस आधीच सुट्टया टकात लाॅग विकेंड साजरा केला. यामुळे सोमवारी देखील बहुतेक सरकारी कार्यालयात सुट्टीचा मुड कायम होता.
जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचा-यांना शिस्त लागावी म्हणून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता एचओडी बैठक घेतात. सोमवार (दि.28) रोजी देखील देशमुख यांनी नेहमीप्रमाणेच एचओडी बैठक आयोजित केली. यासाठी जिल्हाधिकारी स्वत: दहा वाजता कार्यालयात उपस्थित होते. यामुळेच अन्य सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
-------
बैठकीसाठी विभाग प्रमुख उपस्थित
जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत दर सोमवार प्रामाणेच सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यामुळे सर्व विभाग प्रमुख बैठकीसाठी उपस्थित होते.
-------
आठाड्याची सुरूवात वेळेत होण्यासाठीच आढावा बैठक सुरू केली
दर शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी देखील थोड निवांत गेले तर काय फरक पडणार अशी सर्वसामान्य मानसिकता असते. यामुळेच मी दर सोमवारी सकाळी 10.30 वाजता विभाग प्रमुखांची बैठक घेण्यास सुरूवात केली. या बैठकीमुळे दर सोमवारी सर्व एचओडीसह कर्मचारी देखील वेळेत हजर राहतात.
- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी