वाहनभत्ता मिळत असताना पालिकेचे वाहन वापरणारे अधिकारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:38+5:302021-07-14T04:12:38+5:30

पुणे : महापालिकेचे वर्षोनुवर्षे वाहन वापरत असताना, आपल्या वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाने लक्ष्य केले आहे. ...

Officers using municipal vehicles on the radar while receiving vehicle allowance | वाहनभत्ता मिळत असताना पालिकेचे वाहन वापरणारे अधिकारी रडारवर

वाहनभत्ता मिळत असताना पालिकेचे वाहन वापरणारे अधिकारी रडारवर

Next

पुणे : महापालिकेचे वर्षोनुवर्षे वाहन वापरत असताना, आपल्या वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाने लक्ष्य केले आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी यामुळे पालिकेच्या रडारवर आले असून, त्यांच्याकडून त्या पैशांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने महापालिकेचे वाहन वापरत असताना वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन्हीपैकी एकच सुविधा देण्याचे आदेश देतानाच, यापूर्वी हे दोन्ही लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ वसुली सुरू करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नुकतेच दिले आहेत.

महापालिकेच्या २०१६ मधील वाहन धोरणानुसार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना फिरतीच्या कामासाठी वाहन भत्ता दिला जातो. ज्यांना वेतनामध्ये वाहन भत्ता दिला जात आहे, त्यांना महापालिकेचे वाहन वापरता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. परंतु यानंतरही अनेक अधिकारी विशेषत: सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता या पदावरील अधिकारी वाहन भत्ता घेत असतानाच महापालिकेचे वाहनदेखील वापरत असल्याचे समोर आले आल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

रुबल अग्रवाल यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, मोटार वाहन विभागाचे उपायुक्त तसेच सर्व खातेप्रमुखांनी संबंधित माहिती ही, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात यावी. व त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनप्रणालीमध्ये बदल करावेत, असे या आदेशात नमूद केले आहे.

--------

Web Title: Officers using municipal vehicles on the radar while receiving vehicle allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.