कोरोनाबाधित रुग्णासाठी पदाधिकाऱ्याने केला प्लाझ्मा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:22+5:302020-12-04T04:32:22+5:30

सप्टेंबर महिन्यात अॅड. सोमनाथ दौंडकर यांचा कोव्हिड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र वैद्यकीय उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली ...

Officials donate plasma for coronary artery disease | कोरोनाबाधित रुग्णासाठी पदाधिकाऱ्याने केला प्लाझ्मा दान

कोरोनाबाधित रुग्णासाठी पदाधिकाऱ्याने केला प्लाझ्मा दान

Next

सप्टेंबर महिन्यात अॅड. सोमनाथ दौंडकर यांचा कोव्हिड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र वैद्यकीय उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान काळूस येथील एका रुग्णाला ओ - पॉझिटिव्ह रक्तगट असलेला प्लाझ्मा अत्यावश्यक असल्याचे दौंडकर यांना समजताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे रुग्णाच्या नातेवाईकांना भेटून प्लाझ्मा दान केला. कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी प्लास्मा थेरपी अतिशय गुणकारी व प्रभावी असल्याने कोरोनावर मात केलेल्या सर्वांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन ॲड. सोमनाथ दौंडकर यांनी केले आहे.

Web Title: Officials donate plasma for coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.