अरेरेरे, भयंकरच! पाच वर्षाच्या चिमुकल्याला सोसायटीच्या परिसरातच कारने चिरडले, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 23:03 IST2026-01-22T23:01:24+5:302026-01-22T23:03:48+5:30

Car hit Boy in Pune video: सोसायटीच्या परिसरात खेळणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाला भरधाव कारने उडवले. मुलगा चिरडला गेला. ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे.

Oh my, terrible! Five-year-old child crushed by car in society premises, video from Pune goes viral | अरेरेरे, भयंकरच! पाच वर्षाच्या चिमुकल्याला सोसायटीच्या परिसरातच कारने चिरडले, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल 

अरेरेरे, भयंकरच! पाच वर्षाच्या चिमुकल्याला सोसायटीच्या परिसरातच कारने चिरडले, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल 

Car hit Boy Loni Kalbhor Video: सोसायटीच्या परिसरात सायकल खेळत असलेल्या एका पाच वर्षाच्या मुलाचा कार खाली चिरडून मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारी ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुण्यातील लोणी काळभोर भागात हा अपघात घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५ वर्षे) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय ४० वर्षे) हे लोणी काळभोर येथील जॉय नेस्ट सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कारखाली कसा चिरडला गेला मुलगा, व्हायरल व्हिडीओ

कशी घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांचा मुलगा निष्कर्ष याला घेऊन त्यांची सासू सरस्वती रेड्डी या सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. 

सोसायटीच्या आवारात निष्कर्ष खेळत होता. त्यावेळी सोसायटीच्या आवारातच वेगात आलेल्या कारने त्याला उडवले. बराच दूर गेल्यानंतर चालकाने कार थांबवली तोपर्यंत मुलगा फरफटत गेला. 

कारचालक घाईत कारमधून उतरला आणि त्याने मुलाला उचलले. त्यानंतर स्वतःच्या कारमध्ये टाकून तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना घडली तेव्हा सोसायटीच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. काही नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. 

Web Title : त्रासदी: पुणे सोसाइटी में कार से कुचलकर पांच वर्षीय बच्चे की मौत

Web Summary : पुणे के लोनी कालभोर में एक हाउसिंग सोसाइटी में खेलते समय एक पांच वर्षीय बच्चे की कार से टक्कर लगने से मौत हो गई। सीसीटीवी में कैद हुई घटना के बाद पुलिस ने शिकायत पर चालक के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Tragedy: Five-year-old Boy Crushed by Car in Pune Society.

Web Summary : A five-year-old boy died after being hit by a car while playing in his housing society in Loni Kalbhor, Pune. The incident, captured on CCTV, shows the car hitting the boy. Police have filed a case against the driver following the complaint.