अरे व्वा ! कोरोनावर मात केल्यानंतर नाचत- गाजत रूग्णालयातून घरी गेली ६५ वर्षीयवृद्ध महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:46 AM2020-05-21T11:46:48+5:302020-05-21T11:47:13+5:30

मुळात ही महिला आधीपासूनच संधीवात आणि मधूमेह सारख्या आजाराने ग्रस्त होती.

Oh wow After overcoming Corona, a 65-year-old woman went home from the hospital dancing-SRJ | अरे व्वा ! कोरोनावर मात केल्यानंतर नाचत- गाजत रूग्णालयातून घरी गेली ६५ वर्षीयवृद्ध महिला

अरे व्वा ! कोरोनावर मात केल्यानंतर नाचत- गाजत रूग्णालयातून घरी गेली ६५ वर्षीयवृद्ध महिला

Next

पुणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट मानले जाते. सुरूवातीला सर्वाधिक कोरोना रूग्ण पुणे जिल्ह्यातीलच होते. दिवसेंदिवस पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे पुणेकरांना चांगलीच धडकी भरवली असताना एक सुखद बातमी समोर आली आहे.चक्क  65 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात करत ठणठणीत बरी झाली आहे. 

कोरोनामुक्त झाल्यानंतर  आजीबाईंचा आनंद हा गगणात मावेनासा झाला होता. जणु पुर्नजन्मच झाल्याचा आनंद या त्यांना  झाला होता. त्यामुळे नाचत-गाजत वृद्धमहिलने आपला आनंद साजरा केला. या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील औंध रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर  उपचार सुरू होते. कोरोनाचा वृध्दांना जास्त धोका असल्यामुळे या महिलेलाही कोरोनामुळे आपलाही अंत होतो की काय? अशी भीती होती.मात्र जेव्हा तिने कोरोनावर मात केली तेव्हा घरी परतत असताना तिने चक्क नाचत आपला आनंद व्यक्त केला. तिच्यासोबत रूग्णालयाच्या स्टाफने देखील आनंद व्यक्त करत तिच्यासह नाचताना दिसले.


मुळात ही महिला आधीपासूनच संधीवात आणि मधूमेह सारख्या आजाराने ग्रस्त होती. अशा लोकांना कोरोनाचा जास्त धोका असतो. १० ते १२ दिवस महिलेला आयसीयूत ठेवण्यात आले होते. महिलेने देखील डॉक्टरांना उपचारा दरम्यान सहकार्य केले आणि तिने कोरोनावर मात केली. जेव्हा आम्ही वयोवृद्ध महिलेला  घरी जाऊ शकते असे सांगितले तेव्हा ती आनंदाने उठली आणि नाचू लागली. आमच्या सहका-यांनाही तिच्याआनंदता सहभागी होत आनंद साजरा केला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Web Title: Oh wow After overcoming Corona, a 65-year-old woman went home from the hospital dancing-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.